हॅरी पॉटरच्या दुनियेत !

हॅरी पॉटरच्या जादुई दुनियेतील मी टिपलेली व्यक्तिचित्रे


हॅरी पॉटरच्या दुनियेत : Bellatrix Lestrange

बेलाट्रिक्स लेस्ट्रेन्ज ! हॅरी पॉटरच्या दुनियेतील सर्वात खतरनाक Witch !! बेलाट्रिक्सचं पात्र हे रोलिंगबाईंच्या Genius चं खणखणीत उदाहरण आहे... बेलाट्रिक्स विक्षिप्त आहे, azkaban मध्ये राहून दुभंग व्यक्तिमत्त्व म्हणजेच Bipolar Personality तिला जडलेली आहे... हरमायनीला तड्फडवताना आसुरी हसणारी बेलाट्रिक्स पॉटरफॅन्स विसरू शकत नाहीत !




हॅरी पॉटरच्या दुनियेत : The Maruaders

हे आहेत हॅरी पॉटरमधले दुर्लक्षित 'टगे' -The Maruaders ! हॅरीच्या आधीच्या पिढीतील होग्वार्ट्झ गाजवणारे Gryffindor मधले Wizards...यातील प्रत्येकाचा हॅरी पॉटरच्या संपूर्ण कथानकात महत्त्वाचा हिस्सा आहे. तर Maruaders ग्रूपचे मेंबर्स -पहिला म्हणजे हॅरीचा बाप - जेम्स पॉटर !Deathly Hallows पैकी तो Invisible Cloak विरासत म्हणून मिळालेला (Deathly Hallows च्या कथेतील त्या शहाण्या लहान भावाचा वंशज) - उत्साही, करामती करणारा, ग्रूप लीडर असलेला जेम्स पॉटर !!



हॅरी पॉटरच्या दुनियेत : Severus Snape

हा आहे Severus Snape ! पहिल्यांदा आपल्या शाळेतील खडूस मास्तराची आठवण करून देणारा, दुष्ट-गूढ-क्रूर वाटणारा- Neville Longbottom वर रॅगिंग करणारा- Hermoine ला टोमणे मारणारा, हॅरीचा द्वेष करणारा - थोडक्यात 'डोक्यात जाणारा' - जादुई रसायने (Potions) शिकवणारा मास्तर म्हणजे हा स्नेप !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा