मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

गैरसोयीचे महापुरुष : पेरियार

पेरियारांचे विचारधन!

१. पेरियारांचा संविधानाचा द्वेष करण्यावर आणि गांधींचे पुतळे तोडण्यावर भलताच भर होता. गांधींनी अन्य जातींना ब्राह्मणांचे गुलाम बनवले, गांधी ब्राह्मणांसाठी काम करतात असे त्यांचे मत होते. १९५७साली त्यांनी बंडाळीची भाषा करताना, आधी आम्ही संविधान जाळणार आणि मग गांधीचे पुतळे पाडणार अशी योजना केली होती. यासाठी हजारो लोक मृत्युमुखी पडले तर पडू द्याअसं ते म्हणत होते.

(संदर्भ १अ, १ब : पेरियारांचे १९५७मधील लिखाण)

संदर्भ १अ : पेरियारांचे १९५७मधील लिखाण

संदर्भ १ : पेरियारांचे १९५७मधील लिखाण


२. पेरियार आंबेडकरांचा उल्लेख हा "आदि द्रविडार" गटाचे प्रतिनिधी असा करतात.त्यांच्यामते आंबेडकरांनी आपल्या गटापुरते आरक्षण घेऊन टाकले आहे आणि त्यामुळे असे हे पेरियारांच्या मते शूद्रांच्या एकाही प्रतिनिधीचा समावेश नसलेले संविधान त्यांना जाळण्यास पात्र वाटते.

(संदर्भ २अ, २ब : पेरियारांचे १९५१ आणि १९५७मधील लिखाण)
संदर्भ २अ : पेरियारांचे १९५१ आणि १९५७मधील लिखाण

संदर्भ २ब : पेरियारांचे १९५१ आणि १९५७मधील लिखाण


३. पेरियारांचे नास्तिक्य हिंदूंच्या देवांची अवहेलना करते, मात्र ख्रिश्चन-मुस्लिम यांचा एकच देव आहे, आणि त्याचा आपल्याला काही त्रास नाही म्हणून मोकळे होते!

(संदर्भ ३: जेनेसीस ऑफ सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट,
पुस्तक: पेरियार यांचे संग्रहित साहित्य - डॉ. के. विरामणी)

संदर्भ ३: जेनेसीस ऑफ सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट, पुस्तक: पेरियार यांचे संग्रहित साहित्य - डॉ. के. विरामणी


४. पेरियारांचा जिन्नाहबद्दल आदर आणि त्याच्या मार्गावर निष्ठा जागोजागी दिसते. १९५७मध्ये सशस्त्र बंडाळी करायचे आवाहन करताना पेरियार आपल्या समर्थकांना जिन्नाहचा आदर्श घेऊन वेगळे द्रविडराष्ट्र मिळवण्यासाठी रक्ताच्या नद्या वाहण्याचा मार्ग सुचवतात.

(संदर्भ ४ : पेरियारांचे १९५७मधील लिखाण)

संदर्भ ४ : पेरियारांचे १९५७मधील लिखाण



संदर्भस्रोत:

१. FUZZY AND NEUTROSOPHIC ANALYSIS OF PERIYAR’S VIEWS ON UNTOUCHABILITY, 2005

By W. B. Vasantha Kandasamy, Florentin Smarandache , K. Kandasamy

२. Collected Works of Periyar E.V.R.

By Dr. K. Veeramani

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा