डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्भीड, तेजस्वी आणि द्रष्टे विचार!
१. पंतप्रधान नेहरूंवर कठोर टीका करणारे डॉ. आंबेडकर
"याला काय चारित्र्याची चाड आहे का ? या गोष्टींचा तुम्ही सर्वांनी पूर्ण विचार करावयास पाहिजे. या पार्लमेंटमध्ये जाणाऱ्या स्त्रिया अशा बहकलेल्या असतील तर त्यांना तिथे काँग्रेसने जाऊ देण्याचे काय कारण आहे?"
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पृष्ठ क्र. ५३५)
२. विनोबा भावे यांची निर्भीडपणे पोलखोल करणारे डॉ. आंबेडकर
"होय. तोच तो विन्या, काय गोळा केले आहे त्याने ? नाकातून एकीकडे शेंबूड वाहात असता दुसरीकडे तो व्याख्याने देतो."
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पृष्ठ क्र. ५३६)
३. काँग्रेसच्या स्त्रियांना संसदेत पाठवण्याच्या धोरणावर परखडपणे टिकेची झोड उठवणारे द्रष्टे डॉ. आंबेडकर
"स्वधर्म सोडून बायकांनी राजकारणात हिंडावे यासारखी शरमेची गोष्ट नाही. महाराष्ट्रातील बायकांनी आता फक्त कासोटा सोडावयाचाच बाकी ठेवला आहे. काँग्रेसने २९२ बायका लोकसभेत घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर बायका विधिमंडळात गेल्या तर पुरुषांनी काय करावे ?"
"या बाया पार्लमेंटमध्ये जायच्या आणि त्यांची मुले कोणी सांभाळायची ?"
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३, पृष्ठ क्र. ५३४)
४.अ. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकर यांनी सध्याच्या राज्यघटनेबाबत व्यक्त केलेली असंतुष्टता आणि सात्विक संताप
"महाराज, मला लोक म्हणतात, मी राज्यघटना केली. परंतु माझी असे म्हणायची तयारी आहे की राज्यघटना मीच प्रथम जाळून टाकीन. मला ती नको आहे. ती कोणाच्याच सोयीची नाही."
४.ब. हिंदी भाषेचे खंदे पुरस्कर्ते डॉ. आंबेडकर
"मला स्वतःला महाराष्ट्रीय म्हणायला आवडत नाही. मला हिंदी भाषा आवडते. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की हिंदी भाषिक लोकच हिंदी भाषेचे शत्रू आहेत."
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र, धनंजय कीर, पेज नं. ४५३)
विशेष सूचना: आम्हाला डॉ. आंबेडकरांचा शब्द न् शब्द लाखमोलाचा आहे. सदर विधाने हे त्यांचे स्वतःचे विचारधन आहेत. त्यामुळे त्याला कोणी आपल्या अकलेने नाकारत असेल आणि आपले विचार डॉ. आंबेडकर यांच्यावर थोपवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. डॉ. आंबेडकरांचे स्वतःचे शब्द हे आमच्यासाठी वंदनीय आहेत. त्यामुळे आपल्याला आवडत नाहीत किंवा आपल्या अकलेला झेपत नाहीत म्हणून त्यांची विधाने नाकारण्याचा बालिश करंटेपणा टाळावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा